चिपचिप पाऊस रपरप माती

चिपचिप पाऊस रप रप माती
ओल्या सरीत भिजली नाती
भिजल्या पावसात भिजले शब्द
गडगड ढगात मन मात्र स्तब्ध
तुफान वाऱ्यात त्या दोन ओळी
मला आठवतात कोणत्याही वेळी
एक 'आता बस झालं कंटाळा आलाय'
आणि दुसर 'तु मला खूप त्रास दिलाय'
तरीही डोळ्यात तेवत होत्या आशेच्या वाती
तुफानातही उभा राहिलो प्रेमा पोटी
चिपचिप पाऊस रप रप माती
ओल्या पावसात भिजली नाती...

कवी: आत्माराम नाईक

© QualiGeeks (OPC) Pvt. Ltd