दूर दूर जात असताना
दूर दूर जात असताना
मागे वळून पाहत असताना
आठवण मी पुसतोय
मन माझ वाहत असताना
एकलाच का राहत असताना
तरी स्तब्ध मी दीसतोय
एक रेष तळहातावर
पुसट झालेली दीसतेय
तरीही ती का मला
सारखी पाहून हसतेय
वेडूल्या फसलास
इतका हुशार मग कसा
एकच गीरवत बसलास
एक चांदणी मला पाहून
लाजे लाजे म्हणतेय
तू असा कसा रे भाबडा
आणि काहीतरी गुणगूणतेय
हसू येतय मला आता
ते जून सगळ आठवून
काय करणार होतो ठाऊक
नसत ओझ साठवून...
कवी: आत्माराम नाईक
© QualiGeeks (OPC) Pvt. Ltd