नेतृत्व
अंधारातून चडफडताना प्रकाशाच्या आशेवर राहू नये
चंद्र नाही सोबतीला; म्हणून सुर्याची वाट पाहू नये
तारे नाही ना आकाशात; ती जागा मोकळी तुमच्यासाठी
डोळे उघडून बघा नीट; कुणी वाट पाहतंय नेतृत्वाची
एक नेतृत्व द्या या लोकांना
खंबीरपणाचे, उदांत मनाचे
निःस्वर्थी सेवेचे
नव्या संकल्पनेचे
मानवतेचा अभिमान असलेले
शौर्याबाबत भान असलेले
सहसतेचा इतिहास घडवताना
परिस्थितीची जाण असलेले
द्यावी लागेल झुंज एक; स्वतःच्या या कर्तृत्वासाठी
अढळपणा आणावा लागेल; अव्हान राहील प्रयत्नांसाठी
दबणाऱ्यांचा आधार बना; दाबणाऱ्यांवर प्रहार करा
परिवर्तनाचे वारे आणण्यासाठी, एक नेतृत्व हाथी धरा
कवी: योगेश र. नाईक
© QualiGeeks (OPC) Pvt. Ltd