माणूस झाला वाली
काळजाची जाळी, त्यात पळीने ओतलेले पाणी
जेजुरीच्या सोन्यासारखी पिवळी पिवळी नाणी
तरीही का कुणास जाणे किती सुचतील गाणी
जेथून आलोय तिथे नेणार का कुणी
नाही शब्द बरसणाऱ्या पावसाला भिडणारे
नाही साद कुणाची सगळेच चिडणारे
कोरड फुटली असताना पाणी पाणी म्हणूया
किती मोल मोजलय आज ते जाणुया
लाल लाल मातीला चिखलाचा गंध
गंधा गंधा मधून येणारा भिजलेला बंध
माणूस म्हणून जगणारा एकमेव प्राणी
साऱ्या आयुष्यात तोच कसा बनलाय वाणी
किती स्पर्धा केली त्याने स्वतःशीच तरीही
भर मोजत असताना शोधतोय जरीही
आज कुठे जाग आली झोपता झोपता त्याला
तोच आता शब्दांना कसा वाली झाला.
कवी: आत्माराम नाईक
© QualiGeeks (OPC) Pvt. Ltd