आम्ही साधी माणसे

आम्ही साधी माणसे आहोत.
आम्हाला आमचे हक्क बजावता येत नसले तरी त्यांची जाणीव आहे.
त्यामुळे पेपरमध्ये कधी घोटाळे, चोऱ्या बलात्कार असल्या बातम्या वाचल्या की आम्ही चारचौघात शिव्या घालण्या इतपतच मजल मारतो.
त्याहून जास्त कधी एखाद्या नेत्याने स्वतःच्या फायद्यासाठी काढलेल्या मोर्च्यात नकळत जातो.

आम्ही साधी माणसे अहोत.
आमचा राग या परिस्तिथिवर असला तरी आम्ही ट्रेन मध्ये, बस मध्ये बायकोवर किंव्हा अजून कुठल्यातरी सुरक्षित प्रकारच्या वातावरणातच व्यक्त करतो.
कारण तीच बायको, आई आणि मुले आमची संध्याकाळी वाट पाहत असतात.
माझ्यानंतर माझ्या घरचे काय होईल? या विचाराने आम्हाला अगदी झाड बनवलेले असते.
आम्ही प्रेम करतो तेही जपून साऱ्या गोष्टींच भान ठेवून.

आम्हाला विरंगुळा तो कसला.
चहाच्या कट्ट्यावर बसून चार शेजाऱ्यांशी गप्पा मारायचा किंव्हा एखादी विडी, ताम्बकुचा पुडका चारचौघात काढून चोळायचा.
कारण आम्ही साधी माणसे आहोत.

लेखक: आत्माराम नाईक

© QualiGeeks (OPC) Pvt. Ltd